सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 मे 2023 (10:24 IST)

शेततळ्यात बुडून बापलेकाचा मृत्यू

शेतातील तळ्यात पडलेल्या दीड वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारली. पण त्यांना पोहता येत नसल्यामुळे या बापलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बुडणार्‍या पती व मुलाला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी घेतलेल्या महिलेच्या आवाजामुळे जवळच्या परिसरातील लोक मदतीला धावले. त्यामुळे महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं. ही घटना जांबूत जवळील पंचतळे परिसरामध्या रविवारी साडेपाच्या सुमारास घडली. 

मृत सत्यवान गाजरे यांच्या वडिलांच्या नावे जांबूतजवळ पंचतळे येथे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र व गार्डन मंगल कार्यालय असून, मागील बाजूस जवळपास वीस फूट खोल शेततळे आहे. काल सायंकाळी चारच्या सुमारास सत्यवान पत्नी स्नेहल व मुलगा राजवंश याच्यासह या कृषी पर्यटन केंद्रात आले होते. यावेळी फेरफटका मारत असताना राजवंश नजर चुकवून खेळता खेळता शेततळ्यात पडला. ते पाहून सत्यवान यांनी त्याला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने ते देखील बुडू लागले. त्यावेळी शेततळ्याकडे धाव घेतलेल्या स्नेहल यांनी मदतीसाठी आरडाओरडा करीत पती व मुलाला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. दरम्यान, त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने हॉटेलवर असलेले सत्यवान यांचे बंधू किरण गाजरे, प्रवीण गाजरे व हॉटेलमधील कामगारांनी तळ्याकडे धाव घेतली. इतर स्थानिक तरूणांच्या मदतीने तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले. तेव्हा तिघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर सत्यवान व राजवंश यांना मृत घोषित केले.02340