गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जून 2023 (20:53 IST)

शेततळ्यात बुडाल्याने दोन सख्या भावंडांसह बापलेकाचा मृत्यू

drowned
शेततळ्यात बुडाल्याने दोन सख्या भावंडांसह बापलेकाचा मृत्यू झाला. एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाल्याने सामनगाव (ता.जालना) गावावर शोककळा पसरली होती. घटनास्थळी व जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
 
भागवत कृष्णा पडूळ (वय-१०), ओमकार कृष्णा पडूळ (०८), युवराज भागवत इंगळे (०९) आणि भागवत जगन्नाथ इंगळे (३८ सर्व रा. सामनगाव ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत. जालना शहरापासून १० किलोमीटर अंतरावर सामनगाव हे गाव आहे. या गावातील कृष्णा पडूळ यांचे गावच्या शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात भागवत जगन्नाथ इंगळे हे सालगडी म्हणून काम करतात. भागवत इंगळे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतात कामाला गेले होते. सोबत त्यांचा मुलगा युवराजही होता. दुपारच्या सुमारास भागवत पडूळ, ओमकार पडूळ, युवराज इंगळे हे तीन मुलं शेतातील शेततळ्यावर गेली. शेततळ्यातील पाण्यात पोहण्यासाठी ते उतरले होते.

Edited By- Ratnadeep Ranshoor