अजित पवारांकडे ३६ आमदार नाहीत, सर्व मंत्री निलंबित होतील
Ajit Pawar does not have 36 MLAs राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीरगटाने शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यावेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाला असला तरी या गटाने अद्याप सर्व समर्थक आमदारांना एकत्रित बोलावून शक्तीप्रदर्शन केलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार आहेत? याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार गटाकडे दोन-तृतीयांशासाठी आवश्यक असणारे ३६ आमदार नाहीत. त्यामुळे पक्षांतर कायद्यानुसार, अजित पवारांसह सर्व मंत्री निलंबित होतील, असं मोठं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.