सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जुलै 2023 (16:47 IST)

मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपच्या मंत्र्यांचे राजीनामे घेणार?

राज्यात NCP चे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सत्ताधारकांच्या समोर प्रश्न उभे आहे. सर्वात मोठा प्रश्न मंत्रिमंडळाच्या विस्तारा बाबत आहे. अद्याप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खातेवाटप झालेला नाही. सध्या नवीन चर्चा रंगली आहे. शिंदे-फडणवीस सरकार पवार सत्तेचं जुळवणार असून भाजपच्या चार ते पाच मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. 
मात्र भाजप कडून ही चर्चा फेटाळून लावली आहे. 
 
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद घेऊन पक्षेसाठी त्याग केलं. आता पक्षेतील काही मोठे भाजप नेते राजीनामा देतील अशी राजकीय चर्चा सुरु आहे. नेत्यांनी राजीनामा दिल्यावर खातेवाटप केले जातील. मात्र भाजपच्या सूत्रांनी ही बातमी फेटाळून लावली आहे.  त्यांचं म्हणणे कोणत्याही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार नाहीत. सध्या जे मंत्री आहेत, ते मंत्री राहतीलच पण खातेवाटपासाठी आता ज्या मंत्र्यांकडे जास्तीची खाती आहेत, त्यापैकी काही खाती नव्या मंत्र्यांकडे सोपवली जातील. राजीनामा कोणाचाच घेतला जाणार नाही. 
 
Edited by - Priya Dixit