1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 डिसेंबर 2023 (08:31 IST)

मनमाड: विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 12 लाखांची फसवणूक

fraud
मनमाड प्: विदेशात नोकरी लावून देतो असे सांगून मनमाड शहरातील पाच तरुणांना 12 लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सध्या बेरोजगारी वाढली असून प्रत्येक जण नोकरी कशी मिळेल आणि विदेशात नोकरी करण्यासाठी उत्सुक असतो याचाच फायदा घेऊन काही मंडळी बेरोजगार तरुणांना फसवत असते असाच प्रकार मनमाड शहरात घडला असून संजय तानाजी कांबळे राहणार रमाबाई नगर मनमाड या इसमाने विदेशात नोकरी लावून देतो असे सांगून शहरातील तोफिक राज मोहम्मद पठाण, 4 लाख 53 हजार रुपये, मजूंर सलीम सैय्यद,4 लाख 50 हजार रुपये, साजिद शेख, अमजद बिसमिल्ला खान, 1 लाख 10 हजार रुपये आणि अफजल अली, 1 लाख 92 हजार रूपये फसवणूक केले असल्याची तक्रार तोफिक राज मोहम्मद पठाण यांनी मनमाड पोलीस स्थानकात दिली आहे.
 
दिलेल्या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनी भादंवी 420, 407 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor