संबंधित माहिती
- अकोल्यात भीषण अपघात: अकोल्यातील शेगाव-बालापूर रस्त्यावर बस आणि बाईकची टक्कर होऊन भीषण आग
- महाराष्ट्रात काही भागांमध्ये उष्णतेची लाट आणि रेड अलर्ट, तर इतर भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
- शरद पवार यांच्या उपस्थितीत एक मोठा निर्णय; राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) पक्षाने दोन गटांच्या विलीनीकरणाला पूर्णविराम दिला
हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला
विदर्भात तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, पारा ४६°C च्या पार गेला आहे. हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा
विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सविस्तर वाचा
अकोल्यातील शेगाव-बालापूर रस्त्यावर बस आणि बाईकची टक्कर होऊन आग लागली. या अपघातात बाईकस्वार जोडपे जखमी झाले, तर बसमधील प्रवासी सुखरूप बचावले. सविस्तर वाचा
शेतकरी कर्जमाफी योजना ३० जूनपूर्वी लागू केली जाईल. आचारसंहिता लागू असूनही शेतकऱ्यांना दिलासा देण्याची प्रक्रिया थांबणार नाही, असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये महामंडळांच्या विभाजनाचा प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षित असलेला फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. सूत्रांनुसार, महायुतीतील घटक पक्षांमध्ये ४८-२९-२३ हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरात आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत अनेक दुकाने आणि गोदाामे जळून खाक झाली आहे अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव हद्दीत एका भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दुभाजकाचा पत्रा कारच्या आरपार गेला. यात दोन वृद्धांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबाळ यांनी "राज्यात केवळ महिनाभर पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा आहे" असे वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत, "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे," अशी ग्वाही जनतेला दिली आहे. सविस्तर वाचा
नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक झाली आहे. ही मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणल्यानंतर काल रात्री उशीरा अटक केली. सविस्तर वाचा
पुण्यातील कुख्यात आंदेकर आणि म्हस्के टोळीमधील जुना वाद आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदल्याचा रक्तरंजित अंक पुन्हा एकदा समोर आला आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील बालाजीनगर परिसरात रिक्षाचालक अक्षय ऊर्फ बाळा बापू म्हस्के (वय २६) याच्यावर भरदिवसा झालेल्या गोळीबार आणि कोयता हल्ल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आंदेकर टोळीशी संबंधित ६ संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या संपूर्ण हल्ल्याचा कट सध्या येरवडा कारागृहात असलेला आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याने जेलच्या भिंतीआड रचल्याचा दाट संशय आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजपा) सिंहसिंहाचा वाटा म्हणजेच सर्वाधिक जागा लढवणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला पुढीलप्रमाणे आहे:
भाजपा: १२ जागा
शिवसेना (शिंदे गट): ३ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): २ जागा
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना: वर्ध्यात तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले असताना, वृद्ध भाविकांना तीर्थयात्रेसाठी 'स्लीपर कोच'मधून पाठवण्याच्या निर्णयाबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे; तसेच, त्याऐवजी 'एसी कोच'ची (वातानुकूलित डब्यांची) सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
ठाणे न्यायालयाने २००८ मधील 'रेल्वे भरती मंडळ' हल्ल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. घटनास्थळी राज ठाकरे यांची उपस्थिती होती किंवा त्यांनी कोणतीही चिथावणीखोर भाषणे दिली होती, हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नसल्याचे न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले. साक्षीदारांना आरोपींची ओळख पटवता न आल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.
गुरुवारी ठाणे न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची एका जुन्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. हा खटला २००८ सालातील आहे; त्यावेळी कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर कथितरित्या हल्ला करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात सहभागी असलेल्या राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
पीक कर्ज देताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांकडे 'सिबिल स्कोअर' (CIBIL Score) ची मागणी करू नये, अन्यथा संबंधित बँक शाखेवर कठोर कारवाई व गुन्हे (FIR) दाखल केले जातील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सिबिल स्कोअरमुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणे पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या १६७ व्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या (SLBC) बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास त्याचे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि यामुळे शेतकरी आत्महत्येसारख्या घटनांना खतपाणी मिळू शकते.
महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता मुख्यतः तुरळक स्वरूपात राहील. हवामान विभागानुसार नुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि काही भागांत हलका पाऊस किंवा वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे, तर विदर्भात प्रामुख्याने कोरडे हवामान राहील. सविस्तर वाचा
मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अतिक्रमण हटवताना हिंसाचार उसळला. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. पोलिसांनी दंगल, हल्ला आणि हत्येचा कट रचणे यासह विविध कलमांखाली १० नामनिर्देशित आणि १०० हून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा
मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अतिक्रमण हटवताना हिंसाचार उसळला. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. पोलिसांनी दंगल, हल्ला आणि हत्येचा कट रचणे यासह विविध कलमांखाली १० नामनिर्देशित आणि १०० हून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा
विदर्भात तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, पारा ४६°C च्या पार गेला आहे. हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सविस्तर वाचा
महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक असणार असून १५ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट इशारा दिला आहे की; अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई केली जाईल. सविस्तर वाचा
महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तारखेपूर्वी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी बँकांना सिबिल स्कोअरची मागणी न करण्याचे कडक निर्देशही दिले आहे. सविस्तर वाचा
