1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Car accident in Borgaon Borghat area on Mumbai Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात: कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी दुभाजकाला धडकली; दोन वृद्धांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव हद्दीत एका भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी दुभाजकाला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की दुभाजकाचा पत्रा कारच्या आरपार गेला. यात दोन वृद्धांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरगाव/बोरघाट परिसरात कार अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भरधाव स्कोडा कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार लोखंडी दुभाजकाला जोरात धडकली. कार वेगात होती, नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकली. धडक इतकी भीषण होती की दुभाजकातील लोखंडी शीट कारमध्ये घुसली. या भीषण अपघातात पुण्यातील दोन ज्येष्ठ नागरिकांचा (वृद्धांचा) मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे.  अपघातानंतर स्थानिक पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, वाहतूक काही वेळासाठी प्रभावित झाली होती.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
ठाण्यात भाजी मार्केटला आग: ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरात लागलेल्या आगीत अनेक दुकाने आणि गोदाामे जळून खाक