1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. In the NEET case Dr Manoj Shirure was arrested by the CBI

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधून बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेला अटक केली

नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात बालरोगतज्ज्ञ  डॉ. मनोज शिरुरेला सीबीआयकडून अटक झाली आहे. ही मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने लातूरहून चौकशीसाठी पुण्यात आणल्यानंतर काल रात्री उशीरा अटक केली.
डॉ. शिरुरे यांनी स्वतःच्या मुलासाठी नीटचा पेपर मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर (लातूर) कडून खरेदी केल्याचा आरोप आहे. सीबीआयने डॉक्टरची साडेतीन ते चार तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात मोबाइल आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहे. ही प्रकरण अद्याप तपासाधीन आहे. आरोपींना कोर्टात हजर करण्यात येईल आणि पुढील कारवाई होईल.
आतापर्यंत सीबीआयने पेपर फोडणारे, ते विकणारे आणि दलाल किंवा कोचिंग क्लास चालकांवर कारवाई केली होती. परंतु, स्वतःच्या मुलासाठी फुटलेला पेपर विकत घेणाऱ्या पालकाला अटक करण्याची ही संपूर्ण देशातील पहिलीच वेळ आहे. यामुळे शैक्षणिक आणि वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
कोण आहेत डॉ. मनोज शिरुरे?
डॉ. मनोज शिरुरे हे लातूरमधील एक नामांकित बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) आहे. लातूरच्या जुना औसा रोड परिसरात त्यांचे 'सिद्धिविनायक बाल रुग्णालय' आहे.
 
तसेच डॉ. शिरुरे यांनी आरसीसी (RCC) कोचिंग क्लासेसचा संचालक आणि मुख्य संशयित शिवराज मोटेगावकर याच्याकडून आपल्या मुलासाठी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच खरेदी केल्याचा सीबीआयला संशय आहे.
 
लातूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या सीबीआयच्या पथकाने काल संध्याकाळी डॉ. शिरुरे यांच्या रुग्णालयावर आणि घरावर छापा टाकला. त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान ठोस पुरावे हाती लागताच आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच सीबीआयने त्यांना पुण्यात आणून रीतसर अटक केली.
 
सीबीआयने डॉ. शिरुरे यांचा मोबाईल, काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहे. त्यांनी हा पेपर इतर कोणाला दिला होता का, तसेच मोटेगावकर यांच्याशी त्यांचे किती रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले, याचा बँक खात्यांद्वारे तपास सुरू आहे.
 
लातूर पॅटर्नमुळे शिक्षणाचे केंद्र बनलेल्या शहरात अशा प्रकारे थेट डॉक्टरांनाच मुलासाठी गैरमार्ग अवलंबल्याप्रकरणी अटक झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहे, हे स्पष्ट होत आहे.

Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
छगन भुजबाळ यांनी "राज्यात केवळ महिनाभर पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा" वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली; मात्र फडणवीस यांनी "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका स्पष्टीकरण दिले