रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक; १५ ऑगस्टपर्यंत मुदत, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार
महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक असणार असून १५ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट इशारा दिला आहे की; अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित (Ola, Uber, Rapido) कॅब चालकांसाठी मराठी भाषा समजणे आणि बोलणे बंधनकारक केले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक रिक्षा (ऑटो) आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणे बंधनकारक आहे. १ मे २०२६ पासून विशेष तपासणी मोहीम सुरू झाली आहे. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदत देण्यात आली आहे आणि १६ ऑगस्ट २०२६ पासून दंडात्मक कारवाई होणार आहे. यात दंड, परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची शक्यता आहे.
सरकारचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर राज्याची भाषा शिकणे गरजेचे आहे. प्रवाशांशी संवाद सुलभ होईल. काही संघटनांनी विरोध केला आहे, तर मराठी भाषा प्रेमींनी स्वागत केले आहे.
रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांच्या मागणीचा विचार करून सरकारने चालकांना व्यावहारिक मराठी (Spoken Marathi) शिकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीनंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या चालकांवर १६ ऑगस्ट २०२६ पासून दंडात्मक कारवाई सुरू केली जाईल.
प्रवाशांची होणारी फसवणूक, वादावादी टाळणे आणि महाराष्ट्रात व्यवसाय करताना स्थानिक भाषेचा आदर राखला जावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
ALSO READ: महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता
Edited By- Dhanashri Naik

