संबंधित माहिती
- मनोज जरांगे 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार
- शरद पवार आणि छगन भूजबळांची भेट, बैठकीत काय घडले भुजबळांनी सांगितले
- मराठा आरक्षण : माझ्या समाजाचे नेते माझ्या सोबत नाही, मी एकटा लढत आहे -मनोज जरांगे पाटील
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित,ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले
- ओबीसी आंदोलन : 'आम्ही आंदोलन स्थगित केलंय, थांबवलं नाही' - लक्ष्मण हाके
जालना : 22 जुलै पासून ओबीसी जनआक्रोश यात्रेला सुरवात
सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसीला घेऊन प्रचंड तणाव आहे. मनोज जरांगे हे शनिवार पासून पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे. आता ओबीसी समाजाने ओबीसी आरक्षणासाठी 22 जुलै पासून जन आक्रोश यात्रेला सुरुवात करणार आहे. या यात्रेचे नेतृत्व आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे करणार आहे. यांच्यासह इतर ओबीसी नेते सहभागी होणार आहे.
22 जुलै रोजी जालन्यातील दोडडगावातील मंडळ स्तम्भाला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी ओबीसी समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षणावरून ओबीसी समाज राज्य सरकारवर संतापला असून आमचा रोष राज्यसरकार पर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही ही यात्रा काढत आहो असे नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सगेसोयरेंचा अध्यादेश काढता येणार नसल्याचे शब्द दिले होते. त्यांनी शब्द फिरवल्यावर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा वाघमारे यांनी दिला.
22 जुलै पासून ही आक्रोश यात्रा सुरु होऊन जालनाच्या रामगव्हाण, वडीगोद्री, बीड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यातून निघेल आणि छत्रपती सम्भाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात संपणार आहे.
Edited by - Priya Dixit
