1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2024 (18:44 IST)

शरद पवार आणि छगन भूजबळांची भेट, बैठकीत काय घडले भुजबळांनी सांगितले

Meeting of Sharad Pawar and Chhagan Bhujabal
सध्या महाराष्ट्रातील राजकारणात छगन भुजबळ अजित पवार गटावर नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे भुजबळ नाराज असल्याचे बोलले जात होते. 
 
बारामतीत झालेल्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. नंतर आज भुजबळ आणि पवारांची बैठक झाली. या बैठकीत कोणत्या कारणास्तव भेट झाली याचे कारण भुजबळांनी सांगितले. 
ते म्हणाले, आरक्षणाबाबत शरद पवारांशी  चर्चा झाल्याचे भुजबळ म्हणाले.
 
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले,शरद पवार आज मुंबईत असल्याची माहिती मिळाली.  मी पक्षाच्या वतीने नाही तर आमदार म्हणून पवारांना भेटायला आलो. 
 
ते म्हणाले, सध्या राज्यातील स्थिती बिघडली असून मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्दा तापला आहे. मराठा समाजाचे लोक ओबीसींच्या दुकानात जात नाही.
 
यावर शरद पवारांनी काही मार्ग काढावा असे त्यांनी शरद पवारांना म्हटले आहे.या वर शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्याशी सरकारचे काय संभाषण झाले हे माहित नसल्याचे सांगितले. 
 
राज्यसरकारच्या एका मंत्र्याने सांगितले की आम्ही पवारांना मुख्यमंत्र्यांशी बोलून माहिती घेण्याची विंनती केली आहे. या वर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एक दोन दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन देत राजकीय अटकळ फेटाळून लावत ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेट घेण्याचे सांगितले. गरज पडल्यास आम्ही राहुल गांधींची भेट घेणार असे भुजबळ म्हणाले. 
 
 
Edited by - Priya Dixit