रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 20 जुलै 2024 (11:05 IST)

मनोज जरांगे 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार

manoj jarange
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जुलै पर्यंतची मुदत दिली होती ती मुदत संपली असून अजून सरकारने मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे ते 20 जुलै पासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणार आहे. त्यांनी उपोषण करू नये असे अनेकांचे म्हणने असून ते शनिवार पासून बेमुदत उपोषण करणार आहे. 

सध्या मराठवाड्यात मराठा आरक्षण आणि ओबिसी आरक्षणाला घेऊन तणावाची स्थिती आहे. ओबीसी समाज आणि छगन भुजबळ या सारख्या नेत्यांनी या पूर्वीही मराठा आरक्षणाविरोधात अनेक आंदोलने केली आहे. 
उपोषणाबाबत बोलताना जरांगे म्हणाले, राज्य सरकार ओबीसी कोट्यात कुणबीच्या सखे सोयऱ्यासाठी आरक्षण देण्याची अधिसूचना जारी करण्यात अपयशी झाली. 

राज्य सरकार ने 13 जुलै रोजी सखे सोयऱ्यांवर अधिसूचना जारी करण्याचे अश्वासन दिल्यावर देखील पश्चिम महाराष्ट्रातील समुदाय सदस्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठकीत हे निर्णय घेतले. 

जालनातील आंतरवली सराटी येथे 20 जुलै पासून बेमुदत उपोषण करणार असून 7 ऑगस्ट रोजी सोलापुरातून शांतता रॅली सुरु हॊणार आणि 13 ऑगस्ट रोजी संपणार आहे. अशी माहिती मनोज जरांगे पाटीलांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
Edited by - Priya Dixit