शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 जून 2024 (21:13 IST)

मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी सुरु

मराठा आरक्षणासाठी वारंवार लढणारे आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत असून त्यांना सलाईन लावण्याचे वृत्त मिळाले आहे. 
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यभर प्रवास करत आहे. त्यामुळे त्यांना होणाऱ्या दगदगीमुळे त्यांची तब्बेत खालावली असल्याचे डॉक्टर म्हणत आहे. त्यांची ईसीजी आणि टुडी इको चाचणी केली आहे.
 
सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. ओबीसी आरक्षणासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे देखील उपोषणाला बसले होते आज राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होणार असून राज्य सरकार आता मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर काय निर्णय घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Edited by - Priya Dixit