शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2024 (11:51 IST)

जरांगे यांची आजपासून शांतता रॅली!

manoj jarange
शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे आज हिंगोलीला गेले आहे. आज पासून मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅली सुरु करणार आहे. मनोज जरांगे या निर्णयावर ठाम आहे की मराठा आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आज हिंगोलीमधून शांतता रॅली काढण्यात येणार आहे. 
 
सरकारला मनोज जरांगेनी 13 जुलै पर्यंत मुदत दिली आहे. व आज पासून शांतात रॅली 13 जुलै पर्यंत असेल. तसेच विविध ठिकाणी ही शांतता रॅली 13 जुलै पर्यंत काढण्यात येणार आहे. 
 
हिंगोली मधील बळसोंड या ठिकाणी सकाळी दहा वाजता पोहचतील व त्यांचं तिथे भव्य स्वागत होईल. नंतर छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ते सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जातील. व यानंतर रॅलीला सुरवात होईल. व शांतता रॅलीचा समारोप दुपारी ३ वाजता करण्यात येईल.