लातूरसह सात गावांना पाणी पुरवणार्या मांजरा-धनेगाव धरणात जिवंत पाणीसाठा केवळ आठ टक्के शिल्लक आहे. मत साठ्यासह हे पाणी ५५ दश लक्ष घनमीटर इतके होते. हे पाणी पुढचे वर्षभर पुरु शकते. पावसाळा सुरु आहे पण अद्याप धरणात पाण्याची आवक नाही. या धरणावर लातूर, अंबाजोगाई, कळंब, केज, धारुर, मुरुड आणि लातूर एमआयडीसी...