1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. NCP president Sharad Pawar

पवार यांच्या ५० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचा गौरव

राष्ट्रवादी मासिक
राष्ट्रवादी मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या सुवर्णगाथेला शब्दबद्ध करण्यात आले आहे. पवार यांच्या ५० वर्षांच्या संसदिय कारकिर्दीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच महाराष्ट्रातील क्रीडापटूंचा गौरवही करण्यात आला. 
 
या कार्यक्रमाचे सविस्तर वार्तांकन राष्ट्रवादी मासिकातून करण्यात आले आहे. पवार यांचे कार्यकर्तृत्व, त्यांनी धाडसीपणे घेतलेले निर्णय याचा गोषवारा मासिकात वाचायला मिळतो. आस्था ठेऊन काम केल्यास लोक कधी विसरत नाहीत, अशी भावना पवार यांनी मासिकातून व्यक्त केली आहे.
पुढील लेख
मुंबई महानगरपालिका मतमोजणीचा निकाल