संबंधित माहिती
- गाडीतील सॅनिटायझरमुळे भीषण आग, NCP नेत्याचा मृत्यू
- ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा, घटनात्मक पदावर विराजमान झालेल्या व्यक्तीलाही बाळंतकळा याव्यात........
- राज्यात आजचा दिवस पावसाचा, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा
- लोणावळा-खंडाळासह पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली
- पंढरपुरमध्ये भिंत कोसळली, सहा जणांचा जागेवरच मृत्यू
पंढरपुर दुर्घटनेला जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
पंढरपुरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातील पुरस्थितीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70), आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
