शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (07:59 IST)

पंढरपुरमध्ये भिंत कोसळली, सहा जणांचा जागेवरच मृत्यू

पावसामुळे पंढरपुरमधील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटा शेजारील भिंत कोसळली. यात सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागातील घरात पाणी साठालेले होते तर ग्रामीण भागात शेत शिवार मध्ये पाणी साठल्याने मोठं नुकसान झाले.
 
परतीच्या पावसाने पंढरपूरला चांगलेच झोडपून काढले आहे. बुधवारी येथील चंद्रभागा नदीच्या तीरावरील असलेल्या कुंभार घाटा जवळ दुपारी अडीचच्या सुमारास दगडी बांधकाम असलेली भींत सततच्या पावसाने कोसळली. या भितींच्या आडोश्याला सहा लोक उभे होते. अचानक भिंत कोसळल्याने आडोश्याला उभे असलेले नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने ढिगारा काढण्याचे काम सुरु केले. 
 
यापैकी पाच जणांचा जागेवरच तर एकचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये गोपाळ अभंगराव, राधाबाई गोपाळ अभंगराव, मंगेश गोपाळ अभंगराव , पिल्लू उमेश जगताप आणि दोन अनोळखी महिला वारकऱ्यांचा समावेश आहे.