संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान
विठ्ठलभक्तांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने यंदाच्या ३४१ व्या आषाढी पायी वारीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा ७ जुलै २०२६ रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे थाटामाटात प्रस्थान होईल. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख म्हणून विश्वस्त विक्रमसिंह उमराज मोरे-देहूकर, उमेश सुरेश मोरे आणि लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
प्रवास आणि महत्त्वाचे टप्पे:
७ जुलै: प्रस्थान सोहळा (देहू)
८ जुलै: इनामदार साहेब वाडा
९ जुलै: आकुर्डी (श्री विठ्ठल मंदिर)
१० ते ११ जुलै: निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ (पुणे)
१२ जुलै: लोणी काळभोर (कदम वाक वस्ती)
१३ जुलै: यवत (भैरवनाथ मंदिर)
१४ जुलै: वरवंड
१५ जुलै: उंडवडी गवळ्याची
१६ जुलै: बारामती (शारदा विद्यालय)
१७ जुलै: सणसर
१८ जुलै: निमगाव केतकी
१९ जुलै: इंदापूर
२० जुलै: सराटी
२१ जुलै: अकलूज
२२ जुलै: बोरगाव श्रीपूर
२३ जुलै: पिराची कुरोली
२४ जुलै: पालखी वाखरीवरून मार्गस्थ होत २४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होईल.
२५ ते २८ जुलै: पंढरपूर मुक्काम (आषाढी एकादशी सोहळा), ५ जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपुरात साजरा होईल. २५ ते २८ जुलै दरम्यान पालखी पंढरपुरातच मुक्कामी असेल.
रिंगण सोहळे: वारीदरम्यान एकूण ४ गोल रिंगण आणि ३ उभे रिंगण सोहळे पार पडणार आहेत. यात १७ जुलैला बेलवंडी येथे पहिले गोल रिंगण, १८ जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण, तर २० जुलैला अकलूज येथे तिसरे गोल रिंगण आणि नीरा स्नान होईल. २१ जुलैला माळीनगर येथे पहिले उभे रिंगण पार पडेल.
परतीचा प्रवास:
पंढरपुरातील विठ्ठल दर्शन आणि मुक्काम आटोपून २९ जुलै रोजी पालखी सोहळा देहूच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करेल.
यंदाचे विशेष आकर्षण:
गेल्या वर्षी या सोहळ्यात ३९५ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. यंदाच्या वारीसाठी संस्थानतर्फे चौघडा गाडीसाठी तीन नवीन बैलजोड्यांची खरेदी केली जाणार आहे. तसेच पालखीसाठी नवीन चांदीचा रथ तयार करण्याचे कामही सध्या वेगाने सुरू आहे.
