1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
  6. हेसरू बेळे पायसा

Southindian Recipe | हेसरू बेळे पायसा

चव दक्षिणीची
साहित्य : मूग डाळ- पाव किलो, गूळ- अर्धा किलो, तांदूळ- १०० ग्रॅम, एका मध्यम नारळाचा रस, वेलची, सुका मेवा, चवीपुरतं मीठ.

कृती : प्रथम मुगाची डाळ शिजवून घ्यावी. तांदूळ धुवून घ्यावेत. ते थोडे सुकले की भाजावेत व नंतर मिक्सरमध्ये त्याचा बारीक सरसरीत रवा होईपर्यंत वाटावं. १ लिटर पाण्यामध्ये रवा शिजवून घ्यावा, त्यामध्ये शिजवलेली मूगडाळ, गूळ, खोबऱ्याचा रस घालून शिजवून घ्यावं व शेवटी चवीपुरतं मीठ घालावं. सव्‍‌र्ह करताना वरती वेलची, सुका मेवा घालवा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा