शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (09:47 IST)

Shri Vishnu Aarti श्री विष्णुची आरती

संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहुं आले कौतुक ॥ १ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहुं येताति भावा ॥ धृ. ॥
नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ 
ओवाळितां श्रीमुख धनी न पुरे मना ॥ २ ॥
एका जनार्दनी मंगल कौतुकें गाती ॥
मंगल आरत्या गाती मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ ३ ॥