1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
  4. Shirdi Sai Baba Aarti lyrics in Marahti

श्री साईबाबांची आरती Sai Baba Aarti

Shirdi Sai Baba Aarti lyrics in Marahti
जय देव जय देव दत्ता अवधूता । साई अवधूता ।
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा । जय देव जय देव ।। धु ।।
 
अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी । नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं ।
दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं । हरिसी दीनांचें तू संकट दिनरजनी ।। ज0 ।। 1 ।।
 
यवनस्वरुपीं एक्या दर्शन त्वां दिधलें । संशय निरसुनियां तदद्घैता घालविलें ।
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिलें । मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारियले ।। ज0 ।। 2 ।।
 
भेद न तत्वीं हिंदूयवनांचा कांहीं । दावायासी झाला पुनरपि नरदेही ।
पाहसिं प्रेमानें तू हिंदूयवनांही । दाविसी आत्मत्वाने व्यापक हां साई ।। ज0 ।। 3 ।।
 
देवा साईनाथ त्वत्पदनत व्हावें । परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।
त्वत्कृपया सकलांचें संकट निरसावें । देशिल तरि दे त्वघश कृष्णानें गावें ।। ज0 ।। 4 ।।
पुढील लेख
श्री गजानन महाराजांची आरती