सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (23:05 IST)

दैनिक राशीफल (21.10.2021)

मेष राशी भविष्य  
मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणा-या व्यक्तींपासून दूर राहा.
 
वृषभ राशी भविष्य  
कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत खुशखबर अचानक मिळाल्याने तुमच्या कुटूंबात आनंदाचे वातावरण तयार होईल.
 
मिथुन राशी भविष्य 
आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते.
 
कर्क राशी भविष्य  
आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. जुने संबंध, ओळखी आणि मित्रांची मदत होईल. 
 
सिंह राशी भविष्य  
तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पाहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल कराल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. 
 
कन्या राशी भविष्य  
तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. तुमच्यावर प्रेम करणाºया आणि तुमची काळजी वाटणाºया लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा.
 
तुळ राशी भविष्य 
अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. 
 
वृश्चिक राशी भविष्य  
एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. 
 
धनु राशी भविष्य  
तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल.
 
मकर राशी भविष्य 
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. ज्या लोकांनी अतीत मध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे.
 
कुंभ राशी भविष्य 
मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल.
 
मीन राशी भविष्य 
मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल.