शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जानेवारी 2021 (09:21 IST)

संपूर्ण जगासाठी नास्ट्रॅडॅम्सनुसार वर्ष 2021 कसे आहे, जाणून घ्या

हे वर्ष कोरोना साथीच्या नावावर ठेवले होते पण या नवीन वर्षात संपूर्ण जग या साथीच्या रोगाने मुक्त होण्याची आशा बाळगून आहे. तर काही लोकांमध्ये ही भीती आहे की येणाऱ्या वर्षात इतर आपत्तीचा सामना करावा न लागो. कारण भविष्याच्या गर्भात काय दडलेले आहे हे सांगणे कठीण आहे. तरी ही फ्रांसिसी भविष्यवक्ता मायकल नास्ट्रॅडॅम्स च्या भविष्यवाणीला आधार मानून येणाऱ्या भविष्याच्या कल्पना करीत आहे. चला तर मग जाणून घ्या वर्ष 2021 साठी नास्ट्रॅडॅम्स ह्यांनी काय भविष्यवाणी केल्या आहेत.
 
* 2021 मध्ये रशियन व्हायरसचा धोका -
एक रशियन वैज्ञानिक असे जैविक शस्त्र आणि व्हायरस विकसित करेल, जे माणसाला झोंबी बनवणार. अशा प्रकारे मानव जाती नष्ट होईल. जैवशास्त्रीय शस्त्र या काळासाठी संपूर्ण जगासाठी धोका आहे.  
 
* कॅलिफोर्निया मध्ये भूकंप - 
आता पर्यंत नास्ट्रॅडॅमसने नैसर्गिक आपत्तींना घेऊन आणि साथीच्या रोगा बद्दल केलेली भविष्यवाणी अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. या संदर्भाने हे वर्ष 2021 आणखी भयंकर असल्याचे सिद्ध होऊ शकते. जगातील कोणत्याही भागात भूकंपाने विध्वंस होऊ शकतो. एक विनाशकारी भूकंप 'न्यू वर्ल्ड 'उद्ध्वस्त करेल. कॅलिफोर्नियाला ह्याचे तार्किक स्थान किंवा लॉजिकल प्लेस म्हणू शकतो, जेथे हे घडू शकत. 
 
* पृथ्वीशी धडकेल धूमकेतू - 
नास्ट्रॅडॅमसने पृथ्वीशी धूमकेतू धडकण्याच्या घटने बद्दल सांगितले आहे, ज्या मुळे भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्ती येतील. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर हे अस्ट्राईड उकळू लागतील. आकाशात हे दृश्य 'ग्रेट फायर' सारखे असेल. 
 
* 2021 आपत्तीचे वर्ष - 
नास्ट्रॅडॅमस च्या मते, दुष्काळ, भूकंप, वेगवेगळे आजार आणि साथीचे रोग जगाच्या समाप्तीचे पहिले चिन्ह असतील. वर्ष 2020 मध्ये कोरोनाच्या साथीच्या रोगाची सुरुवात मानली जाऊ शकते. वर्ष 2021 मध्ये असा दुष्काळ येईल, ज्याचा सामना या पूर्वी जगाने कधीही केलेला नसावा.
 
* सूर्याच्या नाश झाल्याने पृथ्वीचे नुकसान होईल -
वर्ष 2021 मध्ये सूर्याचे नाश पृथ्वीच्या नुकसानाला कारणीभूत होईल. हवामानातील बदलामुळे युद्ध आणि संघर्षाची स्थिती बनेल. संसाधनासाठी जगात भांडणे होतील लोक इतर स्थळी जातील. ही भविष्यवाणी किती सत्य आहे, हे तर येणारे वर्षच सांगू शकेल पण आपण या गोष्टींना बाजूला ठेवून नवीन वर्षात नवीन आशा नवे ध्येय आणि प्रयत्नांनी प्रवेश करू शकतो. कारण या भविष्यवाणींना कोणतेही वैज्ञानिक आधार नाही.