सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (22:19 IST)

जन्माष्टमी स्पेशल राशिभविष्य : 18.08.2022

janmashatmi
मेष : मेष राशीच्या लोकांनी या जन्माष्टमीला श्री कृष्णाला लाल वस्त्रांनी सजवावे. आणि त्यांना माखन मिश्रीचा नैवेद्य दाखवावा.
वृषभ : या लोकांनी पांढरे वस्त्र परिधान करवून मुरलीधरला लोणी अर्पित करावं. असे मानले जाते की यामुळे त्यांच्या जीवनातील समस्या दूर होतील.
मिथुन : या राशीच्या लोकांनी हिरवे वस्त्र परिधान करून चंदनाचं तिलक लावावं. कृष्णाला दही अर्पित करावं आणि हात जोडून प्रार्थना करावी.
कर्क : या राशीच्या लोकांनी या जन्माष्टमीला श्रीकृष्णांना पांढऱ्या वस्त्रांनी सजवावे. तसेच त्यांना दूध आणि केशर अर्पित करावं.
सिंह : या राशीच्या लोकांनी गुलाबी रंगाच्या कपड्यांनी कान्हाजींना सजवावे. तसेच अष्टगंधाचे टिळक लावूनमाखन-मिश्रीचा प्रसाद म्हणून अर्पण करावा.
कन्या : या लोकांनी कान्हाजीला हिरव्या रंगाच्या कपड्यांनी सजवावं आणि त्यांना मावा अपिर्त करावा.
तूळ : या लोकांनी कान्हाला गुलाबी कपडे घालावेत. त्यानंतर त्यांना तूप अर्पण करावं.
वृश्चिक : या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला लाल वस्त्रांनी सजवावं. त्यानंतर कान्हाजीला लोणी किंवा दही अर्पित करावं.
धनू : या राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. यानंतर, त्यांना फक्त पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी.
मकर : या राशीच्या लोकांना निळे कपड्यांनी कान्हाला सजवावं. पूजेनंतर, कान्हाजीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी या जन्माष्टमीला ठाकूरजीला निळ्या वस्त्रांनी सजवावे. त्यानंतर त्यांची पूजा करुन त्यांना बालूशाहीचा नैवेद्य दाखवावा.
मीन : या राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि कुंडल घालावे. नंतर केशर आणि बरफी अर्पित करावी.