शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जून 2022 (16:50 IST)

तूळ राशीसाठी जून 2022 महिना काळजी घ्यावी लागेल

tula horoscope
तूळ : हा महिना सावध राहण्याचा आहे. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देतील. काही मोठे आजार येऊ शकतात. वैवाहिक जीवनात कटुता राहील. जोडीदारासोबतच्या कोणत्याही वादामुळे घटस्फोटाची परिस्थिती उद्भवू शकते. तुम्हाला नवीन प्रेमसंबंध मिळेल, ज्यामुळे तुम्हाला या महिन्यात दिलासा मिळेल. आर्थिक संकटही येऊ शकते. तुमच्या कामात हलगर्जीपणा राहील. वाहन अपघात, यंत्रसामग्री आदींमुळे इजा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सतर्क रहा. 18 जूननंतर हा काळ थोडासा दिलासा देणारा असेल. संकट कमी होईल. लाभाच्या अनेक संधी तुमच्या अवतीभवती फिरतील पण कोणता निर्णय घ्यायचा योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही. एकंदरीत या महिन्यात तुम्ही भ्रमाच्या स्थितीत असाल. कौटुंबिक वाद, मातृपक्षाचे आरोग्य बिघडणे यासारख्या परिस्थिती देखील उद्भवू शकतात. भावंडांपासून विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण होईल.
 
अनेक योजना पूर्ण होतील. काळानुसार वेगवान होण्यास शिका. या महिन्यात अनेक संधी येतील, पण आपल्या आळशीपणामुळे त्या आपल्यापासून दूर जातील. वेळ गेल्यावर रडत बसण्‍यात अर्थ नाही हे समजून घ्या. विद्यार्थ्यांनी आळस टाळून अभ्यास करण्‍याची गरज आहे. महिलांनी खरेदी करताना आपल्या ऐपतीचा विचार करावा. या राशीच्या व्यक्तींच्या विचारात सातत्याने बदल होत असतात. स्वत:चे विचार इतरांसमोर न मांडता ते गुप्त ठेवणे, एखाद्या घटनेचा धुर्तपणे विचार करणे अशा काही सवयीही या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात.