बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (23:05 IST)

1 ते 7 'मे' 2022 महिन्यातील साप्ताहिक राशीफल

weekly rashifal
मेष : सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. करीयरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील.
 
वृषभ : यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. मित्रांचा आधार मिळेल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण झाल्याने आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल. अपत्यांपासून आनंद प्राप्तीचे योग. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचा एक चांगला योग संभवतो परंतु त्यासाठी आपणास फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. 
 
मिथुन : प्रवासाच्या खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. व्यापार-व्यवसायात काळ अनुकूल आहे. हा आठवडा आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. 
 
कर्क : ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या.  बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम जाईल.
 
सिंह : ठरावीक वेळेत कार्य पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. 
 
कन्या : कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. आनंदाची बातमी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. 
 
तूळ : आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे कही बोलू नका. महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल.अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. 
 
वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. अधिक खर्च होईल. आपणास घरात राहून साफसफाई,आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणू शकते. 
 
धनू : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. एखाद्या कार्यासाठी सहयोग घ्यावा लागेल. व्यापार-व्यवसायात स्थिती साधारण राहील. शत्रूंपासून सावध राहा. अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे महत्त्वाच्या नवीन प्रोजेक्ट आरंभ करण्याची योग्य वेळ आता आली आहे. 
 
मकर : शत्रूंपासून सावध राहा. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आरोग्य मध्यम राहील. संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शक्यता आहे. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. मुले त्रास देऊ शकतात. प्रणयातही समस्या येण्याची शक्यता. आपण आनंददायक स्वप्नांच्या जगात आणि कल्पनेच्या साम्राज्यात विहार कराल. 
 
कुंभ : योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. या आठवड्यात आरोग्य नरम-गरम राहील. नोकरदार मंडळीनो काळजीपूर्वक काम करा. मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. 
 
मीन : मित्रांपासून आनंद मिळेल. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित रहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा. भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहा. संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो.