गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (19:37 IST)

साप्ताहिक राशीफल 8 ते 14 मे 2022

weekly rashifal
मेष - कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा असेल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कडक धोरणाचा जाच वाटेल. विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीचे तंत्र उपयोगी पडेल.  
 
वृषभ - नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले अ- ल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल.
 
मिथुन -  हाताबाहेर गेलेल्या गोष्टी रुळावर येतील. तुमच्या कार्यपद्धतीत आणि विचारात बदल होईल. व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधून तुमचा मतलब साध्य कराल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेला महत्त्व द्या. कामात बदल हवा असेल तर त्या दृष्टीने हालचाल करावी. घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल. वेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तरुणांनी विवाहाचा निर्णय घाईने घेऊ नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरची पकड ढिली करू नये.
 
कर्क - पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील. कुटुंबातील आप्तांचे रुसवेफुगवे सहन करावे लागतील. त्याकरता मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी चांगल्या ग्रहमानाचा फायदा घ्यावा.
 
सिंह - तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये कामाच्या रचनेत फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ताण वाढेल. घरातील व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.  
 
कन्या -  सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. कारखानदारांनी कामगारांशी मर्यादेपेक्षा जास्त मवाळपणाने वागू नये. नोकरीत युक्तीने कामात चालढकल कराल. घरामध्ये तात्त्विक मतभेद होतील. विद्यार्थ्यांनी मूड बाजूला ठेवावेत.
 
तूळ -  काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल. पण वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे अडखळल्यासारखे होईल. घरामध्ये एकमेकांच्या विचारांची तफावत जाणवेल. विद्यार्थ्यांनी नवे प्रयोग टाळावेत.
 
वृश्चिक -  एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड अ- ल. सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. घरामध्ये प्रत्येकजण आपले तेच खरे करण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांनी शंकांचे वेळीच निरसन करावे.
 
धनू - तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत अ-  पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी लाभेल. नोकरीत नेहमीच्याच कामात तुमची धाडसी प्रवृत्ती दिसून येईल. लांबलेल्या कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळावा.
 
मकर - तुमच्या प्रगतीला पूरक अ-  वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी अ- ल. व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल. जादा भांडवलाची गरज वाटेल. नोकरीत नेहमीच्या पद्धतीने काम न झाल्याने कामाची पद्धत बदलावी लागेल. तुमचे विचार घरातील व्यक्तींच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांनी मनात शंका ठेवू नये.
 
कुंभ - अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल. सवलतींचा उपयोग योग्य कारणाकरताच करावा. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू नका. केलेल्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. प्रिय व्यक्ती आणि मित्रमंडळी खर्चात टाकतील.
 
मीन - गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल. खेळत्या भांडवलासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. नोकरीत हक्क आणि अधिकारासाठी लढा द्यावासा वाटेल. नव्या नोकरीचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. घरात तुमचे धोरण सबुरीचे ठेवा. विद्यार्थ्यांनी मन शांत ठेवावे.