मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: बुधवार, 31 मे 2023 (08:50 IST)

जून 2023 महिन्याचे मासिक राशीफल

मेष : या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात घरापासून दूर जावे लागेल. कायद्याची शिकार बनाल. आवश्यक ते परवाने मिळतील. घरगृहस्थीत समस्या जाणवतील. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे.  घराण्याच्या स्थावर मालमत्तेतून काही आर्थिक फायदा होईल. नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. वाहन-वास्तूचे योग येतील. प्रतिष्ठीत व्यक्तीचे घराला पाय लागतील.  
 
वृषभ : या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. पोटदुखी जाणवेल. प्रवास घडेल. उत्तरार्धात वरिष्टांची गैरमर्जी होऊ शकेल. हौसमौज कराल. दागिने घ्याल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ डोक्यातच कल्पनेच्या स्वरूपात होती ती आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ही आपल्या यशोगाथेतील एक मोठी झेप ठरेल.  कौटुंबिक सौख्य लाभेल. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान लाभेल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. इच्छापूर्ती होईल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल.
 
मिथुन : कामात यश मिळेल. वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फारच फ़ायदेशीर ठरेल. अर्धवट आणि अडलेल्या कामांना गती येईल. आरोग्याप्रती बेपर्वाई तुम्हाला महागात पडू शकते. धर्माप्रती आवड वाढेल. मित्रांची मदत मिळेल. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. उत्तरार्धात प्रवास घडेल. पोटदुखी जाणवेल. जवळच्या व्यक्तींना दुरावू नका. विवाह जुळतील. नवीन रोजगार मिळेल. कलाक्षेत्रात चमकाल. कुटुंबाची जबाबदारी घ्याल. 
 
कर्क : प्रेमासाठी अनुकूल वेळ आहे. महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विदेशातही जाऊ शकता. काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. मनाची कुचंबणा होईल. उत्तरार्धात संघर्षातून यश मिळेल. वैवाहिक जीवनात त्रास संभवतो. अतिआ‍त्मविश्वास राहील.  थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. कवि, कलाकार, गायक, लेखक यांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात षष्ठस्थ मंगळामुळे उष्णतेच्य विकारांचा त्रास जाणवेल. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे.  
 
सिंह : वैवाहिक जीवन तुमचे सहकार्य आणि वेळ मागत आहे. घरगृहस्थीची चिंता राहील. कुटुंबाला आधार द्याल. उत्तरार्धात शिक्षणात अडचणी येतील. संततीला त्रास संभवतो. सुवर्णालांकारांची खरेदी कराल. मानसिक उन्नती होईल. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने लाभ होईल. वेळेचे महत्त्व ओळखा. तुम्ही जरा व्यावहारिक झाले पाहिजे, अति भावनिकता तुमचे नुकसान करू शकेल. वडिलांचे स्वास्थ्य तुम्हाला काळजीत पाडेल. बौद्धीक व कला क्षेत्रात चांगली संधी लाभेल. व्यवसायात नवीन योजना राबवू शकाल. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मोठय़ा यशासाठी प्रयत्न करावे लागतील. मार्गदर्शन घडेल. एखाद्या चांगल्या घटनेने मनोबल वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. 
 
कन्या : जीवनात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे. कामे यशस्वी होतील. कुटुंबात मनमानी कराल. विवाह जुळतील. जुन्या गोष्टी विसरून मार्गक्रमण करा. वातावरणाचा आनंद लुटा. शैक्षणिक कार्यात खर्च होईल. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी साहाय्यकारी सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. स्थावरात गुंतवणूक म्हणून खर्च कराल. जुने मित्र भेटतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. 
 
तूळ : काम वेळेत पूर्ण होतील. योजना पूर्ण होतील. 15 तारखेनंतर कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करा. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. संघर्षातून यश मिळेल. निवडणुकीत यश मिळेल. परदेशगमन घडेल. महत्वाकांक्षी रहाल. बॉस तुमच्या कामावर युश होईल. सहकर्मचारी सहाय्य करतील. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. आडत्यांसाठी वेळ चांगली आहे.  कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. उत्तरार्दात जवळचे प्रवास सुखाचे करणारा आहे. भावाबहिणींशी संबंध चांगले राहतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.  
 
वृश्चिक : संघर्षानेच यशप्राप्ती होईल. धंद्यात चैतन्य आणाल. स्वभाव खर्चिक बनेल. आर्थिक लाभ होतील. विपरीत बुद्धी होईल. अचानक कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. तुमच्या या घाईगडबडीचा फायदा तुमचे विरोधक घेऊ शकतील. शांत राहून चांगले कर्म करत राहा. मांसाहार आणि मद्यसेवन टाळणे ठीक होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवडयात परिस्थिती बदलायचा सुरूवात होईल. वर्षाचा शेवट सकारात्मकतेने होईल.  प्रवासातून कार्यसिद्धी होईल. आपण आपली बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळेच आपल्या मतांचा आदर केला जाईल. मनस्वास्थ लाभेल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकाराल. अधिकारावर असणार्‍या स्त्री व्यक्तीकडून आपले लांबलेले काम होईल.
 
धनू : या महिन्यात ग्रह तुमच्यासोबत आहेत. मोठे खर्च निघतील. नेत्रविकार जाणवेल. उत्तरार्धात नवीन कल्पना सूचतील. अधिकार मिळतील. विवाह जुळेल. बिघडलेली कामे होतील. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनेरी वेळ आहे. लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल. नोकरी-व्यवसायात स्थिरस्थावरता येईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आपली आर्थिक बाजू बळकट करणार्‍या घटना घडतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. अनावश्यक खर्च उद्भवतील.  
 
मकर : यश आपली वाट पाहत आहे, बस योग्य संधी ओळखा. थोरांचा सहवास लाभेल. लोकांकडून कौतुक होईल. आर्थिक लाभ होतील. उत्तरार्धात मोठे खर्च निघतील. नेत्रविकार जाणवेल. नैतिकता पाळा. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल. प्रेम-संबंध दृढ होतील. एखाद्याला दिलेले वचन जरूर पाळा. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल. वरीष्ठांच्या सल्ल्यानेच कामे मार्गी लावा. नोकरीत मनासा.रख्या घटना घडतील. उत्साह वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रातील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. सरकारी दरबारी रेंगाळलेल्या कामात यश मिळेल. 
 
कुंभ : मिळकतीचे स्त्रोत वाढू शकतात. स्पर्धापरिक्षांमध्ये यश मिळू शकते. या दरम्यान तुम्ही उंच झेप घेऊ शकता, पण कठोर परिश्रमांना तयार असाल तरच तुमच्या सकारात्मक उर्जेचा स्त्रोत निरंतर टिकेल. नोकरीत बढती मिळेल. खरेदी विक्री वाढेल. मित्रांची मदत मिळेल. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात.  नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कामाचे चांगले नियोजन कराल. धावपळीचे, कष्टाचे सार्थक होईल. नव्या कामात अपेक्षित यश मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल.  
 
मीन : लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. 15तारखेनंतर कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतो. इतरांची बाजू नीट ऐकूनच कोणताही निर्णय द्या. कामासाठी घरापासून दूर जाल. कायदेशीर बाबी सांभाळा. उत्तरार्धात खरेदी विक्री वाढेल. संपत्ती लाभ, वारसा लाभ संभवतो. शारीरिक तक्रारीकडे लक्ष द्या. धंद्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षणात अडचणी येतील. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल.मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील.