शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शनिवार, 1 एप्रिल 2023 (13:37 IST)

Best Destinations: एप्रिल महिन्यात फिरण्याचे ठिकाण

मुलांच्या परीक्षा संपल्या की लोकांना बाहेर जाणे आवडते. वातावरणातील गारवा मनाला आनंदाची अनुभूती देतो आणि त्यामुळेच लोकांना कुठेतरी भेट द्यायची असते. मात्र, फिरायला कुठे जायचे हा पहिला प्रश्न मनात येतो. खरं तर मनात शंका येते की बाहेर फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास तर होऊ नये . चला तर मग अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊ या.जिथे आपण कौटुंबिक सहल करू शकता. 
 
 
1 शिमला-कुफरी, हिमाचल प्रदेश-
जर तुम्हाला बर्फाची आवड असेल तर तुम्ही शिमला-कुफरी टूरला जाऊ शकता. हिमवर्षाव व्यतिरिक्त, आपण विविध एडव्हेंचर्सचा  आनंद घेऊ शकता आणि मॉल रोडवर खरेदीचा अनुभव घेऊ शकता.
 
2 केरळ-
या काळात तुम्ही केरळला फिरायला जाऊ शकता. केरळच्या निसर्गसौंदर्याची भव्यता नुसती बघण्यासारखी असते. यामुळेच केरळ हे फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते. तुम्ही येथे कोवलम आणि वर्कला समुद्रकिनारे, अलेप्पी बॅकवॉटर, थेक्कडी आणि कुमिली मसाल्याच्या बागा आणि मुन्नार चहाच्या बागा इत्यादी पाहू शकता. याशिवाय निसर्गप्रेमींसाठी सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क हे एक उत्तम ठिकाण आहे.
 
3 औली, उत्तराखंड-
तुम्ही औली उत्तराखंडला भेट देऊ शकता. येथे तुम्ही नंदा देवी, नीलकंठ आणि मान पर्वताची भव्य शिखरे पाहू शकता किंवा स्कीइंगचा आनंद घेऊ शकता. औली हे स्कीइंगसाठी उत्तम ठिकाण मानले जाते. जवळपास वर्षभर हिरव्यागार दऱ्यांमुळे हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असून या ठिकाणचे सौंदर्य बघण्यासारखे आहे. 
 
4 गोवा-
 उत्तम पर्यटन स्थळाचा विचार केला तर त्यात गोव्याचे नाव नक्कीच घेतले जाते. एप्रिलच्या महिन्यात लोकांना गोव्याला जायला आवडते. गोव्याचे आल्हाददायक हवामान, निर्मळ समुद्रकिनारे, वॉटरस्पोर्ट्स आणि नाइटक्लब यामुळे गोवा भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे.

Edited By - Priya Dixit