शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

या मंदिरात तेवतो आहे जलदीप

नंदादीप कुठे तेलावर तर कुठे तुपावर तेवतात. मध्यप्रदेशातील एका चमत्कारी देवी मंदिरात मात्र गेली अनेक वर्षे असा दीप चक्क पाण्यावर तेवतो आहे. मध्यप्रदेशच्या माळवा प्रांतातील गडीया घाट गावात हा चमत्कार घडतो आहे. 
 
काली सिंध नदीच्या काठी हे देवी मंदिर आहे. येथील पुजारी सिद्धूसिंह सोंधिया सांगतात, लहानपणापासून त्यांनी या देवीची उपासना केली आहे. तेव्हा मंदिराच्या दिव्यात तेल घालून तो पेटविला जात असे. मात्र एकदा देवी त्यांच्या स्वप्नात आली व तिने दिव्यात पाणी घालून ते पे‍टविण्यास सांगितले. सकाळी पूजा करताना सिद्धूसिहानी खरोखरच दिव्यात पाणी घातले व तो पेटविला तर तो व्यवस्थित तेवला. तेव्हापासून या दिव्यात पाणीच घातले जात आहे. हे पाणी कालीसिंध नदीचेच घातले जाते.
 
सुरुवातीला ग्रामस्थांनी विश्वास ठेवला नव्हता, मात्र आता कित्येक वर्षे नदीचे पाणी घालूनच हा दीप प्रज्वलित केला जात असल्याने हा देवीचा चमत्कार मानला जात आहे व दूरदूरुन भाविक हे पाहण्यासाठी येथे येतात. अर्थात पावसाळा संपल्यानंतरच हा दीप प्रज्वलित केला जातो कारण पावसाळ्यात हे मंदिर नदीच्या पाण्याखाली जाते.