संबंधित माहिती
- एप्रिल महिना संपत आला; तुम्ही मे महिन्यात सुट्टीत मुलांसोबत सहलीचे नियोजन नक्कीच करू शकतात
- Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात
- कोकणातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र जागृत परशुराम मंदिर चिपळूण
- भारताचे हृदय असलेल्या मध्य प्रदेशातील ही पाच अनमोल स्थळे, जी पर्यटकांना एक अनोखा अनुभव देतात
- भारतात अनके प्रसिद्ध शिव मंदिरे आहे; परंतु काही मंदिरांची त्यांच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे एक वेगळी ओळख
Ice cream capital of India कर्नाटकातील मंगळूर एक विलक्षण सुंदर शहर; भारताची आईस्क्रीम राजधानी
Karnataka Tourism : भारतात अतिशय सुंदर ठिकाणे आहे. अनेकांना हिमाचल प्रदेशातील शिमला-मनाली आणि उत्तराखंडमधील मसुरी-नैनिताल यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला आवडते. पण ही थंड हवेची ठिकाणे आता शांततेऐवजी गर्दीने भरलेली असतात. याकरिता आज आपण असे एक सुंदर शहर पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात. तसेच 'भारताची आईस्क्रीम कॅपिटल' म्हणून ओळखले जाणारे शांत आणि सुंदर ठिकाण म्हणजे कर्नाटकातील मंगळूर होय.
ALSO READ: Golden Temple सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब
कर्नाटकातील मंगळूर हे एक विलक्षण सुंदर शहर आहे. मंगळूर हे कर्नाटकातील एक सुंदर किनारपट्टीचे शहर आहे. हे शहर आपल्या सोनेरी समुद्रकिनाऱ्यांसाठी, प्राचीन मंदिरांसाठी आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मंगळुरूला भारताची आईस्क्रीम राजधानी म्हटले जाते. शहरातील आईस्क्रीम पार्लर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. जर तुम्ही या ठिकाणी फिरण्याचा विचार करत असाल, तर येथील वैशिष्ट्यपूर्ण आईस्क्रीम चाखायला विसरू नका. मंगळुरूचे किनारपट्टीचे हवामान आणि स्थानिक चवी आईस्क्रीम संस्कृतीला प्रोत्साहन देतात.
कर्नाटकातील मंगळूर येथे भेट देण्यासारखी ठिकाणे- तुमच्या माहितीसाठी, पनंबूर बीच, कुद्रोली गोकर्णनाथ मंदिर, सेंट अलोशियस चॅपल आणि सुलतान बॅटरी यांसारखी ठिकाणे मंगळुरूमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी आहे. जर तुम्हाला सी-फूड आवडत असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. मंगळुरूचे शांत वातावरण तुम्हाला येथे पुन्हा पुन्हा भेट देण्यास प्रवृत्त करू शकते.
