शुक्रवार, 4 एप्रिल 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 3 एप्रिल 2025 (07:30 IST)

पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर

Mundeshwari Devi Temple
India Tourism : चैत्र नवरात्री सुरु आहे. या पवित्र पर्वावर लोक प्रार्थना, उपासना किंवा ध्यान करण्यासाठी एकत्र येतात त्या जागेला देवाचे पूजेचे घर म्हणतात. तसेच भारतात देखील प्राचीन मंदिरे आढळतात. तसेच नवरात्रीच्या या दिवसांमध्ये भक्त मंदिरामध्ये जातात. तसेच आपण आज चैत्र नवरात्री विशेष एक असेच देवीचे प्राचीन मंदिर पाहणार आहोत जे पर्वतावर आहे. तुम्ही देखील या पवित्र पर्वामध्ये देवीमंदिराला नक्कीच भेट देऊ शकतात. भारतात अशी प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. जिथे गेल्याने मनोकामना पूर्ण होतात.
मुंडेश्वरी देवी मंदिर
मुंडेश्वरी देवीचे मंदिर बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील भगवानपूर भागात पावरा टेकडीवर ६०८ फूट उंचीवर आहे. हे मंदिर प्राचीन असून जे १०८ इसवी सनात बांधले गेले. हुविष्काच्या कारकिर्दीत इ.स. १०८ मध्ये त्याची स्थापना झाली. येथे शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. तसेच हे देशातील सर्वात प्राचीन मंदिर मानले जाते. गेल्या २०२६ वर्षांपासून या मंदिरात पूजा अखंडपणे सुरू असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर ६३५ मध्ये अस्तित्वात असल्याचा उल्लेख आहे. काहींच्या मते, मंदिरातून सापडलेल्या शिलालेखानुसार, ते उदय सेनच्या कारकिर्दीत बांधले गेले होते. तसेच येथे डोंगराच्या ढिगाऱ्यात गणेश आणि शिव यांच्यासह अनेक देवी-देवतांच्या मूर्ती सापडल्या.  
तसेच या मंदिराच्या पूर्वेकडील भागात, मुंडेश्वरी देवीची भव्य आणि प्राचीन दगडी मूर्ती आकर्षणाचे केंद्र आहे. या मंदिराच्या मध्यभागी पंचमुखी शिवलिंग स्थापित आहे.तसेच मुख्य मंदिराच्या पश्चिमेला पूर्वाभिमुख नंदीची एक मोठी मूर्ती आहे. हे मंदिर सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर त्याच्या भव्यतेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी प्रसिद्ध आहे. मुंडेश्वरी मंदिरात रामनवमी आणि शिवरात्रीचे सण विशेष आकर्षण असतात आणि दरवर्षी मोठ्या संख्येने यात्रेकरू या मंदिराला भेट देतात.