भोपाळमध्ये ताजमहाल!

taj mahal, bhopal
ताजमहाल म्हटले की आपणाला आठवते ते शहर म्हणजे आग्रा. पण मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथही एक ताजमहाल आहे परंतू त्याला मकबरे नाहीत आणि त्याची कोणतीही लव्हस्टोरी नाही. मुघल वास्तू कलेचा बेजोड नमुना असलेला हा महाल बादशहा शाहजहानने बांधलेला नसून तो बांधला आहे बेगम शाहजहानने.
1861 ते 1901 या काळात भोपाळ संस्थानची प्रमुख असलेल्या बेगम शहजहान हिने स्वत: राहण्यासाठी राजमहाल बांधला परंतू याचे सौंदर्य इतके अप्रतिम होते की त्याचे ताजमहाल असे आपोआपच नामकरण झाले. या महालात 120 खोल्या आहेत. 8 मोठे हॉल आहेत. हा बांधण्यासाठी 13 वर्षे लागली. सतरा एकर परिसरात याचे बांधकाम पसरले आहे. यासाठी त्याकाळात तीन लाख रूपये खर्च आला होता. हा महाल तयार झाल्यानंतर तीन वर्षे बेगमने जल्लोष साजरा केला होता.

या ताजमहालाबाबत एक आठवण सांगितली जाते. याच्या प्रवेशद्वारावर एक विशिष्ट प्रकारची काच बसवण्यात आली होती, त्यातून परावर्तीत होणारी किरणे प्रवेश करणार्‍या व्यक्‍तीच्या डोळ्यावर पडत. त्यामुळे त्याला प्रवेश करताना खाली मान घालूनच आत जावे लागे. एका ब्रिटिश अधिकार्‍याला हा अपमान वाटला, म्हणून त्याने बेगमला ती काच काढण्याचा हुकूम केला. बेगमने तो साफ नाकारला. दहावेळा इशारा देऊनही बेगमने ती काच काढली नसल्याचे पाहून अधिकारी स्वत: तेेथे आला. त्याने आपल्या सैनिकांकरवी बंदुकीचे शंभर राऊंड फायर केले, तरीही ती काच फुटली नाही. या महालातून एक भुयार असून ते 40 किलोमीटर लांब असलेल्या रायपूर शहरात जाते, असे सांगितले जाते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट
करोनाच्या लढाईत आपण एकत्र आहोत, अशी धीर देणारं‍ ट्विट बॉलीवूड बादशाह शाहरुख खानंने केलं ...

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील जनतेशी संवाद साधून 5 एप्रिल रोजी ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...