गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (20:39 IST)

आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम, एकदा आवर्जून भेट द्या

Visit Machilipatnam in Andhra Pradesh once and for all To Visit Machilipatnam in Andhra Pradesh once and for all Tourism Marathi Andhra Tourism Inormation in Marathi  Informationa About Machilipattnam In Marathi आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम
आंध्र प्रदेशात अनेक समुद्र किनारे आहेत. उदाहरणार्थ , मंगीनापुडी बीच, भिमुनीपट्टणम बीच, मायपाडू बीच, वोडारेऊ बीच,  रामकृष्णा बीच, ऋषिकोंडा बीच, सूर्यलंका बीच, यनम बीच, उडप्पा बीच इत्यादी. पण या सर्वात मच्छलीपट्टणम मांगीनापुडी याला तोड नाही. 
 
मच्छलीपट्टणम बीच :
1 आपल्याला विकेंड साजरा करायचा असेल तर हिल स्टेशन किंवा इतर  ठिकाणी जाण्यापेक्षा मच्छलीपट्टणम बीचला जाण्याचा प्लान करू शकता. या बीचचे सौंदर्य देखणाजोगते आहे. 
2  कृष्णाडेल्टा जवळ असलेल्या या बीच वरून समुद्राचे दृश्य पाहणे खूप आनंददायी आहे. 
3 दरम्यान, आपण मासेमारीसाठी बोट देखील भाडयाने घेऊन डेल्टाचा फेरफटका मारू शकता. 
4 मांगीनापुडी बीच हे आंध्रप्रदेशात आहे. जे मच्छलीपट्टणम शहरापासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आहे. 
5 या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कृष्णाउत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच त्या वेळी या समुद्रकिनाऱ्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येथे रात्रभर संगीत आणि नृत्य सुरु असते. 
6 मछलीपट्टणम  शहरात बघण्यासारखे इतर ठिकाण देखील आहे. जसे पांडुरंगा स्वामी मंदिर, लाईट हाऊस, भगवान शिवाचे मंदिर, मच्छलीपट्टणम चर्च, साई महाराज देवालय  इत्यादी .