मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)

नोहेंबर मधील गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी भेट द्या.

Auli
भारतात काही ठिकाणी लोक हिवाळ्याची वाट पाहतात. तर काही ठिकाणी खूप थंडी असते. पण ही थंडी अनेक जणांना आवडते. कारण थंडी सोबत असते शेकोटी व शेकोटी जवळ बसून गरम गरम कॉफी, चहा यांचा अनुभव काही वेगळाच असतो. तसेच असे काही ठिकाणे आहे जिथे गुलाबी थंडीचा अनुभव नक्कीच घेता येतो. जर तुम्हाला थंडीत फिरायला जायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या पर्यटन स्थळी भेट द्या .
 
गुलमर्ग-
हिमवर्षाव पाहण्यासाठी गुलमर्ग हे भारतातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. नोव्हेंबरमध्ये येथील तापमान 4°C आणि 11°C दरम्यान असते. ज्यामुळे तुम्ही येथे बर्फवृष्टीचा आनंद नक्कीच घेऊ शकता. तसेच  इथली सुंदर दृश्ये पाहण्यासाठी स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि गोंडोला राईड करता येते.
 
पहलगाम-
पहलगाममध्ये नोव्हेंबरमध्ये पहिली बर्फवृष्टी होते. तसेच हे ठिकाण बर्फाच्छादित कुरणात आणि पाइनच्या जंगलात जाण्यासाठी आणि घोडेस्वारीसाठी उत्तम आहे.
 
लेह-
लेह हे एक सुंदर निसर्गरम्य हिल स्टेशन आहे. नोव्हेंबरपर्यंत हे ठिकाण वंडरलैंडमध्ये बदलते. इथून हिमवर्षावाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो. या सुंदर ठिकाणी बर्फाच्छादित शिखरे आणि स्वच्छ निळे आकाश पाहणे अनेक पर्यटकांना आकर्षित करते. 
 
कुफरी-
शिमल्या जवळील कुफरी हे देखील हिमवर्षाव पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत येथे बर्फवृष्टी पाहायला मिळते. कुफरी हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे, जिथे तुम्ही याक राइडिंग आनंद घेऊ शकता.
 
औली-
औलीमध्ये नोव्हेंबरमध्ये हिमवर्षाव सुरू होतो. हे पर्यटन स्थळ स्कीइंग आणि स्नो ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. येथे तापमान -2 डिग्री सेल्सियस इतके कमी होते. येथून सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो.