India Tourism : आज गुरुपौर्णिमा आहे. तसेच आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. भारतात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक जण हा आपल्या गुरुप्रती निष्ठावान असतो. व गुरूपौर्णिमा दिवशी मनोभावे गुरूंची पूजा करावी. म्हणजे गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो. भारतात अनेक मंदिर आहे त्यापॆकी आज आपण पाहणार आहोत "गुरु-शिष्य मंदिर". जे आजही गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगतात. तर चला जाणून घेई या भारतातील गुरूंची महती सांगणारे आणि गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगणारे मंदिरे जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात .
गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व-
गुरु-शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जी हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मात खोलवर रुजलेली आहे. ही परंपरा गुरुकडून शिष्याकडे ज्ञान, अध्यात्म, कला, संगीत किंवा इतर विषयांचे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देते.
गोरखनाथ मंदिर गोरखपूर उत्तर प्रदेशातील
गोरखनाथ मंदिर हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरात आहे. गोरखनाथ मंदिर गोरखपूरमध्ये प्राचीन काळापासून अखंड योगाभ्यासाचा क्रम चालू आहे. ज्वालादेवीच्या ठिकाणाहून प्रवास करताना 'गोरखनाथजी' भगवती राप्तीच्या नदीकाठच्या परिसरात येऊन तपश्चर्या केली आणि त्याच ठिकाणी त्यांची दिव्य समाधी स्थापन केली, जिथे सध्या 'श्री गोरखनाथ मंदिर आहे. गोरखनाथ मंदिराचे सध्याचे महंत श्री बाबा योगी आदित्यनाथ जी आहे. गुरुपौर्णिमेला येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.
व्यास मंदिर वाराणसी
वाराणसीतील रामनगर येथे असलेले व्यास मंदिर त्याच्या धार्मिकतेसाठी आणि सभ्यतेसाठी प्रसिद्ध आहे, ते वाराणसीच्या समोर गंगा नदीच्या पूर्व तीरावर वसलेले आहे, व्यास मंदिर महावेद व्यासजींना समर्पित आहे, वेद व्यास या ठिकाणी ध्यान आणि पूजा करत असत आणि येथे भगवान रामाचे मंदिर देखील बांधले गेले होते.
श्री गोरखनाथ मंदिर राजस्थान
पूर्व राजस्थानमधील गुरु गोरखनाथांचे हे पहिले मंदिर आहे, ज्याचे बांधकाम १२ वर्षांत पूर्ण झाले. हे मंदिर नाथ पंथाच्या गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक आहे, जिथे गुरुला देवाच्या समान मानले जाते.
गुरु मंदिर अकोला महाराष्ट्र
महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात कारंजा गाव आहे. गुरु श्री नृसिंह सरस्वती मंदिर आहे. तसेच हे मंदिर दत्तात्रेय परंपरेचे एक महत्त्वाचे गुरु श्री नृसिंह सरस्वती यांच्याशी संबंधित आहे. या भागाला "शेषाणिखित क्षेत्र" म्हणून ओळखले जाते आणि येथे गुरु-शिष्य परंपरेचा खोलवर प्रभाव आहे.
सुवर्ण मंदिर अमृतसर
पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर यांची स्थापना गुरु अर्जुन देव जी यांनी केली होती आणि ते शीख धर्मातील गुरु-शिष्य परंपरेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.
महर्षी व्यास मंदिर यावल महाराष्ट्र
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील यावल मध्ये मध्ये महर्षी व्यास मंदिर आहे. तसेच सातपुडा पर्वत रांगेतील तापी नदीच्या खोर्यात असलेले यावल शहर महाभारताचे रचयिता श्री महर्षी व्यास यांची भुमी म्हणून प्रसिध्द आहे. तसेच या मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.