बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बिहार विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Updated : बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (15:23 IST)

राष्ट्रवादी आणि शिवसेना बिहार विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार ?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाबिहार विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याची चर्चा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा. शरद पवार यांच्या सोमवारच्या ‘वर्षा’वरील भेटीत त्यावर चर्चा झाली. 
 
बिहारमध्ये काँग्रेसने आधीच त्यांची आघाडी जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु आणि भाजपचे जागा वाटप झालेले आहे. मायावतींच्या बसपाने असादुद्दीन ओविसी यांच्या एमआयएमसोबत ‘वंचित’ आघाडी उभारली आहे. शिवसेना यापूर्वीच एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. पवार-ठाकरे भेटीत यावर चर्चा झाल्याचे एका नेत्याने सांगितले.