1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. भाजप राष्ट्रीय अधिवेशन

अडवाणींचा इंदूर ते इंदूर प्रवास पूर्ण

अडवाणींचा इंदूर ते इंदूर प्रवास पूर्ण
भारतीय जनता पार्टीचे ज्‍येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज 'इंदूर ते इंदूर पर्यंत'चा आपल्‍या राजकीय कारकीर्दीचा दीर्घकालीन प्रवास आज पूर्ण केला. मी आता थकलो असून मला आरामाची आवश्‍यकता आहे असे सांगतानाच त्यांनी यापुढील काळात पक्षाचा प्रवास नितीन गडकरींच्‍या नेतृत्वाखाली आणि संघाच्‍या मार्गदर्शनाखाली चालेल असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

गेल्‍या दोन दिवसांपासून अडवाणी अधिवेशनात असूनही मौन धारण करून होते. अर्थात, त्‍यांच्‍या मौनातही अनेक गुपिते दडली असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत होते. आजच्‍या राष्ट्रीय अधिवेशनाच्‍या समारोप प्रसंगी त्यांनी आपल्‍या मौनामागे दडलेले संन्‍यासाचा विचार सर्वांसमक्ष ठेवला.

इंदूरशी असलेले नातेही त्‍यांनी उलगडून सांगितले ते म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्‍या पहिल्‍या शिबिरात सहभागी होण्‍यासाठी ते पहिल्‍यांदा १९४३ मध्‍ये इंदूरला आले होते. त्‍यानंतर या अधिवेशनाच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा एकदा इंदूरला येणे झाले. त्‍यामुळे इंदूर ते इंदूर हा प्रवास पूर्ण झाल्‍याचे त्यांनी सांगितले.

आपल्‍या भाषणातून त्यांनी आपण या व्‍यासपीठावर सर्वांत वृध्‍द असल्‍याचे सांगून आपल्‍याला आता विश्रांती हवी असल्‍याची इच्‍छा व्‍यक्त केली. अडवाणींच्‍या राजकीय संन्यासा मागे संघाची भूमिका महत्‍वाची ठरली आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा