दीपिकाने शेतकरी प्रश्नी पुढाकार घ्यावा

deepika
Last Modified बुधवार, 14 ऑक्टोबर 2015 (10:56 IST)
अभिनेत्री दीपिका पदुकोणने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मानसिक आधार देण्यासाठी हातभार लावावा, अशी इच्छा खुद्द महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पाश्र्वभूमीवर फडणवीसांनी ही गरज व्यक्त केली आहे.
‘आम्हाला दीपिकाला एक मिशन द्यायचं आहे. हे मिशन शेतकर्‍यांशी संवाद साधण्याचं आहे’ अशी माहिती ‘लिव, लव्ह, लाफ’ या दीपिकाच्या फाउंडेशनच्या लाँचच्या वेळी दिली. ‘एखाद्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही
ताण-तणाव हे शब्द वारंवार ऐकता. जवळपास सगळेच जण त्याला सामोरे जात आहेत. प्रत्येकाचा त्याच्याशी दोन हात करण्याचा मार्ग वेगवेगळा असतो. काही जणांना ताणतणाव कसे हाताळावे याची माहिती नसते. बरेच जण त्याविषयी बोलणं टाळतात, भावना व्यक्त करताना कचरतात.’ असंही ते म्हणाले. ‘ज्येष्ठ नागरिकांना मन मोकळं करायला कोणी सोबती नसतो. त्यामुळे काही वेळा ते पोलीस कंट्रोल रुमला (100 क्रमांकावर) फोन करतात. आम्ही शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर केलेल्या एका सर्वेक्षणात 40 टक्के शेतकरी तणावग्रस्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे आर्थिक मदतीपेक्षा शेतकर्‍यांना त्यांचं महत्त्व, त्यांची आवश्यकता पटवून देण्याची गरज आहे.’ असं मुख्यमंर्त्यांनी सांगितलं.

मानसिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून दीपिका पदुकोणने मानसिक आरोग्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. लिव्ह, लव्ह, लाफ फाउंडेशन असं दीपिकाच्या संस्थेचं नाव आहे. स्वत: डिप्रेशनची शिकार झालेल्या आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर आलेल्या दीपिकाने 6 ऑगस्टला ट्विटवरून या फाउंडेशनची माहिती दिली होती.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

साई बाबा मंदिर अजमेर

साई बाबा मंदिर अजमेर
अजमेर येथील अजय नगर येथे प्रसिद्ध साई बाबा मंदिर आहे. हे मंदिर 1999 मध्ये गरीब नवाज ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, ...

VIDEO: सोनू सूद साइकलवर ब्रेड, अंडी विकायला बाहेर गेला, म्हणाला - कोण म्हणतो मॉल बंद आहे
सोनू सूद कोरोना व्हायरसने पीडित लोकांना प्रत्येक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या

हिमालयाचा प्रवास करायचा असल्यास या 10 गोष्टी जाणून घ्या
भारताचे राज्य जम्मू, काश्मीर, लद्दाख, उत्तराखंड ,सियाचीन, हिमालय, सिक्कीम, आसाम,अरुणाचल ...

नियम म्हणजे नियम

नियम म्हणजे नियम
वर्गात शिक्षक मुलांना विचारत होते

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर ...

'प्लॅनेट मराठी'वर ३० जूनला झळकणार 'जून' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे - बायस यांच्यासह 'जून'च्या ...