बुधवार, 10 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

परिणिती बनणार चमेली

परिणिती बनणार चमेली
बासू चटर्जी यांचा ‘चमेली की शादी’ हा सिनेमा अनेक सिनेरसिकांच्या लक्षात असेल. हलकाफुलका विनोद आणि जोडीला पहेलवान अनिल कपूर आणि शाळकरी अमृतासिंग यांच्यातील रोमान्स असा हा धमाल सिनेमा होता. या सिनेमाचा आता रिमेक बनत असून चमेलीची भूमिका बबली आणि चुलबुली परिणिती करणार आहे. मुळचा सिनेमा जर कोणी पाहिला असेल तर यात चमेलीच्या भूमिकेसाठी परिणितीशिवाय दुसरी अभिनेत्री असू शकत नाही, हे लक्षात येतेच. 
 
तर अनिल कपूरची भूमिका ही दलजीत दोसांज करणार आहे. फँटम फिल्मस् या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तर रोहित जुगराज या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.