रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 15 एप्रिल 2015 (11:34 IST)

प्रसिध्दीसाठी क्रिकेटपटूंशी सलगीचा सल्ला!

richa chadda
प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी क्रिकेटपटूंशी सलगी करण्याचा सल्ला मिळाला होता, असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री रिचा चढ्ढाने केल्याने खळबळ उडाली आहे.


प्रसिद्धीत राहण्यासाठी व काम मिळवण्यासाठी अभिनेत्रींना कराव्या लागणार्‍या मेहनतीवर आधारीत शॉर्ट फिल्म ती करत आहे. याविषयी बोलताना रिचा म्हणाली, मनोरंजन क्षेत्रात आल्यावर मला अनेक सल्ले मिळाले. चांगल्या उत्पादनांची जाहिरात करण्यापासून ते ख्यातनाम व्यक्तींच्या विवाहावेळी नाचण्याचेही सुचवण्यात आले. क्रिकेटपटूला डेट केल्याने प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल असेही एकाने सुचविले होेत, असेही ती म्हणाले.