शाहिदच्या एक्स-गर्लफ्रेंड्सना नाही लग्नाचे निमंत्रण!  
					
										
                                       
                  
                  				  पुढील महिन्यात अभिनेता शाहिद कपूर लग्नगाठीत अडकणार आहे. लग्नात सहभागी होणार्या पाहुण्यांची यादी तयार झाली आहे. लग्नात शाहिदच्या कुटुंबीयांसह जवळचे काही मित्र सहभागी होणार आहेत. मात्र 12 जुलै रोजी होणार्या रिसेप्शनमध्ये बॉलीवूडमधील बरीच मंडळी सहभागी होणार असल्याचे समजते.
				  													
						
																							
									  
	 
	गर्लफ्रेंड करिना कपूर खानला आमंत्रित करणार असल्याची शक्यता होती. शिवाय प्रियांका चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र या तिघींनाही शाहिद रिसेप्शनमध्ये बोलावणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
				  				  
	 
	शाहिदच्या जवळच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या कोणत्याही एक्स गर्लफ्रेंडला लग्नात बोलावणार नाहीये. प्रेमात तो अपयशी ठरला. आता तो आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे, त्यामुळे भूतकाळाची सावली त्याला त्याच्या वर्तमानकाळावर पडू द्यायची नाहीये.