रणवीरने खरेदी केले घर

Last Modified शुक्रवार, 26 जून 2015 (11:02 IST)
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने वांद्रयातील त्याचे आईवडीलांचे घर सोडले असून तो आता गोरेगावला शिफ्ट झाला आहे. गोरेगावमध्ये रणवीरने स्वत:चा फ्लॅट खरेदी केला आहे. खरं तर रणवीर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमासाठी गोरेगाव येथे शिफ्ट झाला आहे.

त्याचे कारण म्हणजे अलीकडेच रणवीरच्या खांद्याची सर्जरी झाली आहे. डॉक्टरांनी त्याला हळू चालणे आणि अँक्शन सीन्स न करण्याचा सल्ला दिला आहे. शेड्यूलला उशीर होऊ नये यासाठी रणवीरने सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तो आता 12 तास शूटिंग आणि चार तास फिजिओथेरपी करणार आहे. हे सर्व सांभाळणे त्याला कठीण होत आहे. रणवीरच्या वांद्रयास्थित घरापासून गोरेगाव फिल्म सिटी 20 किमी अंतरावर आहे. मात्र पाऊस आणि ट्रॅफिकमुळे हे अंतर कापायला दीड तासांहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे त्याने गोरेगावमध्ये घर घेतले असून फिल्म सिटीपासून ते केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.

‘बाजीराव मस्तानी’मध्ये रणवीरसह आणि प्रियांका चोप्रा मेन लीडमध्ये आहेत. जानेवारी 2016 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

पावसाळी वनवैभव : मेळघाट

पावसाळी वनवैभव : मेळघाट
परतवाडा सोडलं अन् समोर दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची ...

प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार

प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार
प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी ...

‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा

‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या ...

लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो

लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो
एक माउशी टीव्ही विकत घ्यायला गेल्या माउशी दुकानदाराला हा टीव्ही कितीला आहे?

कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी

कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी
कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही ...