गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:58 IST)

आमिरने घातली १ लाख रुपयांची गुलाबी रंगाची जीन्स

आमिर खानने चक्क गुलाबी रंगाची जीन्स घातली असून या जीन्सची किंमत आहे १ लाख रुपये. अनेक पुरूषांना  गुलाबी रंग फक्त महिलांसाठीच आहे असे वाटते. पण बी- टाऊनच्या या सुपरस्टारने नुकतीच या रंगाची जीन्स घातली आणि आत्मविश्वासाने प्रसारमाध्यमांना फोटोही काढून दिले.

एका कार्यक्रमात जाताना आमिरने पांढऱ्यां रंगाचे शर्ट, गुलाबी रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचे बुट घातले होते. तसेच त्याने एक स्लिंग बॅगही घेतली होती. या लूकमध्ये तो महाविद्यालयीन तरूणच वाटतो. मिस्टर परफेक्शनिस्टच्या अनेक चाहत्यांना हा लूक हवा- हवासा वाटत असेल.