Biodata Maker marathi
✕

Aamir Khan: 'लाल सिंग चड्ढा'नंतर आमिरचे पुन्हा एकदा पुनरागमन,या चित्रपटात दिसणार!

Updated: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (22:49 IST)
 
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान प्रत्येक चित्रपटात आपल्या प्रेक्षकांसाठी काही वेगळा आशय घेऊन येतो. आमिरने बहुतेक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये समाजाबद्दल नक्कीच काहीतरी छुपा संदेश आहे. मात्र, अभिनेत्याचा मागील चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिरने चित्रपटातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. आता बातम्या येत आहेत की आमिर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 
 
आमिर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये दिसणार असल्याची बातमी समोर येत आहे. अविनाश अरुण या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अविनाशने 'पाताळ लोक', 'स्कूल ऑफ लाईज' आणि 'किला' सारखे चित्रपट केले आहेत.
अविनाश अरुण यांनी नुकतंच यावर भाष्य केलं आहे.ते म्हणाले, अजून हे सगळं प्राथमिक स्तरावर आहे. यावर चर्चा सुरु आहे. आत्ता जे काही तुमच्यापर्यंत पोहोचतय त्या सगळ्या सांगीवांगी बातम्या आहेत.”
 
 एका मुलाखतीत आमिर म्हणाला, 'ही गोष्ट कशी समोर आली हे मला माहीत नाही कारण प्रत्यक्षात हा चित्रपट अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याबद्दल बोलणे खूप घाईचे आहे. माझ्याकडे काही कल्पना आहेत, परंतु अद्याप त्याबद्दल काहीही ठोस नाही. अद्याप काहीही अंमलबजावणी झालेली नाही. सध्या फक्त चर्चा सुरू आहे.
आमिरने त्याच्या आगामी चित्रपटांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, या अभिनेत्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
 



Edited by - Priya Dixit   
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

गोवा आणि महाबळेश्वर विसरा! हिवाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ५ ऑफबीट ठिकाणं लावतायत पर्यटकांना वेड

पंचायत सीझन ५ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ३ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य नसल्यास कोकणातील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन दर्शन घ्या

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

पुढील लेख
Show comments