गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2023 (11:38 IST)

Aamir Khan चेन्नईच्या पुरात अडकला आमिर खान

aamir khan
Twitter
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईला पूरासारखी परिस्थिती आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट आहे, हे 4 डिसेंबरला आलेल्या चक्रीवादळाने सिद्ध केले आहे. शहरात मुसळधार पावसामुळे बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान अडकला. शहरात पाणी साचल्याने पाणी, वीज आणि खराब फोन सिग्नल या समस्यांशी आमीर खान तब्बल 24 तास झगडत होता.
 
बचाव पथक येण्यापूर्वी आमिर खान शहरातील करप्पाकम परिसरात 24 तास अडकून पडला होता. अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडियाच्या माध्यमातून अडकल्याची माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार कॉलिवूड अभिनेता विष्णू विशालसोबत त्याच्या करप्पाकम येथील घरी थांबला होता. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आमिर खान सेलिब्रिटी कपल विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टासोबत दिसत आहे
 
आमिर खान गेल्या काही महिन्यांपासून चेन्नईमध्ये राहत असून तेथे त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत. कामाबद्दल बोलायचे झाले तर, आमिर खान लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'सितारा जमीन पर' वर काम करण्यास सुरुवात करणार आहे. अभिनेत्याने अलीकडेच सांगितले की त्याच्या पुढच्या चित्रपटाची थीम 'तारे जमीन पर' सारखीच आहे. आमिर खानचा यापूर्वीचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट खूप फ्लॉप झाला होता.