संबंधित माहिती
- आमिर खानने 'लगान' आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या २५ वर्षांच्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला
- बद्रीनाथ धाम येथे हृदयविकाराच्या झटक्याने महाराष्ट्रातील दोन भाविकांचा मृत्यू
- फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर पुणे महानगरपालिकेच्या होर्डिंग धोरणाला स्थगिती
- सारा अली खानला केदारनाथमध्ये NO ENTRY
- विकी कौशल-कतरिनाच्या मुलाचा फोटो व्हायरल
रीना, किरण आणि गौरी एकत्र एकाच गाडीत; आमिर खानच्या 'मॉडर्न फॅमिली'चा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या!
बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. आमिर खान लवकरच (५ जुलै रोजी) त्यांची मैत्रिण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाची पूर्वतयारी सुरू असतानाच आमिर खानचा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये आमिर खान, त्याच्या दोन्ही पूर्व पत्नी म्हणजे रीना दत्ता आणि किरण राव, तसेच त्यांची होणारी तिसरी पत्नी गौरी स्प्रॅट आणि मुलगा आझाद राव खान एकत्र दिसले. एका कौटुंबिक कार्यक्रमानंतर हे सर्वजण एकाच गाडीतून (कारमधून) प्रवास करताना दिसल्याने नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि सोशल मीडियावर यावर मोठी चर्चा रंगली आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसलं?
या कौटुंबिक भेटीनंतर जेव्हा सगळे गाडीत बसत होते, तेव्हा आमिर खान ड्रायव्हरच्या बाजूला पुढच्या सीटवर बसला. तर त्याची होणारी पत्नी गौरी स्प्रॅट, माजी पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद हे गाडीच्या मागच्या सीटवर एकत्र बसले. नंतर रीना देखील कारमध्ये बसताना दिसल्या. गाडी निघण्यापूर्वी मागच्या सीटवर बसलेल्या किरण राव आणि गौरी स्प्रॅट यांच्यात खूप छान गप्पा रंगल्या आणि सगळे एकत्र हसतानाही कॅमेऱ्यात कैद झाल्या.
???? Only Aamir Khan has the rare talent to take his first wife, second wife, and maybe even a future third wife in the same car ride! ????????
— Indian Observer (@ag_Journalist) June 16, 2026
Talk about maintaining diplomatic relations at the highest level! ????#AamirKhan #Bollywood #ViralPost #FunnyPost #Meme #BollywoodMemes… pic.twitter.com/pthMxH5Xl5
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
आमिर खानच्या या आधुनिक कुटुंबाची ही केमिस्ट्री पाहून सोशल मीडियावरील युजर्स चक्रावून गेले आहेत. काही चाहत्यांनी त्यांच्यातील समजूतदारपणा आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे कौतुक केले आहे; तर काहींनी आमिर खानच्या या कौटुंबिक समीकरणावर आश्चर्य व्यक्त करत "हे कसं शक्य आहे?" असा प्रश्न विचारला आहे.
कौटुंबिक सलोखा
यापूर्वीही 'लगान' चित्रपटाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रीना दत्ता, किरण राव आणि गौरी स्प्रॅट एकत्र आल्या होत्या. आमिरने आधीच स्पष्ट केले आहे की, जरी त्याचे रीना आणि किरणसोबतचे वैवाहिक नाते संपले असले, तरी ते सर्वजण एका कुटुंबासारखेच राहतात आणि एकमेकांच्या सुख-दुःखात कायम सोबत असतात.
