शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिषेकचा ऐश्वर्यासोबत काम करण्यास नकार

गुरू, रावण, कुछ ना कहो आणि सरकार राज यांच्यासारख्या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी या सगळ्याच चित्रपटात प्रेक्षकांना फार आवडली होती. त्यांना पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर बघण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. पण या दोघांनी 2007 मध्ये लग्न केल्यानंतर एकाही चित्रपटात एकत्र काम केले नाही.
 
अभिषेकबरोबर काम करण्यासाठी स्वत: ऐश्वर्या उत्सुक आहे. याबाबत अजून कोणतीही  अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच ते दोघे एकत्र चित्रपट करणार असल्याच्या चर्चा सिनेवर्तुळात सुरू होत्या. पण स्वत: अभिषेकने या गोष्टीला नकार दिला आहे.
 
अभिषेक बच्चन आणि बंटी वालिया याच्या मोशन पिक्चर्स अंतर्गत प्रभुदेवासोबत एक नवीन चित्रपट बनवत असून याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा होम प्रोडक्शन चित्रपट काम करण्यासाठी उत्सुक होती. पण अभिषेकला त्याच्या चित्रपटात मुख्य भूमिका निभावण्यासाठी एका तरुण चेहर्‍याची गरज होती. तो सध्या नवीन चेहर्‍याच्या शोधात आहे.
 
अभिषेकला वाटते की, ऐश्वर्या या व्यक्तिरेखेसाठी जास्त मोठी आहे. पण याबाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे खरे कारण काय आहे हे कोणालाच माहीत नाही.