शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (21:11 IST)

Pushpa 2: पुष्पा 2'च्या सेटवर अभिनेता अल्लू अर्जुनला दुखापत,शूटिंग थांबवले

प्रेक्षक 'पुष्पा 2' या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट सध्या निर्मिती प्रक्रियेत आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अल्लू अर्जुनच्या राष्ट्रीय पुरस्काराने या चित्रपटाला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. चित्रपट निर्माता सुकुमार यांच्या सिक्वेलसाठी कोणती नवीन कथा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.  अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.

आजकाल अल्लू 'पुष्पा-द रुल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना अल्लू अर्जुनच्या पाठीला दुखापत झाली असून शूटिंग रद्द करून पुढे ढकलण्यात  आले असून डिसेंबरच्या मध्यावर ठेवले आहे.  अभिनेत्याची प्रकृती खालावली असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
चित्रपटाच्या या गाण्यात अल्लू अर्जुन एका महिलेच्या गेटअपमध्ये डान्स करताना दिसणार आहे. यानंतर अॅक्शन सीनही पाहायला मिळणार आहे. अल्लू अर्जुनला या भागाचे शूटिंग करताना त्याच्या पाठीत जडपणा जाणवू लागला आहे, त्यामुळे 'पुष्पा 2' च्या या गाण्याचे शूटिंग सध्या थांबवण्यात आले आहे.निर्माते आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चित्रपटाच्या या भागाचे शूटिंग सुरू करतील. अल्लू अर्जुन लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावा अशी अभिनेत्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा 2' च्या रिलीजची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.ल्लू अर्जुन व्यतिरिक्त, 'पुष्पा: द रुल' मध्ये फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू, अनुसया भारद्वाज आणि इतरांचा समावेश आहे. 'पुष्पा 2' पुढील वर्षी 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
 
Edited by - Priya Dixit